For Your Eyes Only

For Your Eyes Only
एकेक रेषा जोडत सुष्टी सुरेख रूप घेते आणि आपल्यासाठी मूक मार्गदर्शन करते. वेगाने ध्येयाकडे झेपावण्यासाठी प्रोत्साहन देण्याच किती विलक्षण सामर्थ्य आहे या रेषात !

My Way

सुविचार


पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ.
जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंता सुद्धा. 
हृदयाची श्रीमंती नसेल तर कुबेर सुद्धा भिकारी राहतो. 
स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.
जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळवण्याची ठेवा.
मृत्यू नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
अहंकार आणि लोभ हे माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे दुख आहे.
यशस्वी व्हायचं असेल तर कल्पना नव्हे तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात
सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी जीभ
आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून 
वागत जा
आयुष्यात निचित काही मिळवायचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
शांतता बाहेर सापडणे कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असते.
मनुष्यला आपल्या दारिद्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला  
पाहिजे ती दुर्गुणाची
नव्या बादलीतून पाणी गळत नाही ना याची खात्री होई पर्यंत जुनी  
बादली फेकून देऊ नये.
जीवनामध्ये निचित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी  
साधन शोधण्याची गरज भासते.
युद्धाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात हि नसून माणूस 
माणसाला मारायला तयार होतो हि आहे.
झोप आली असताना जो झोपी जात नाही आणि झोप येत असताना 
जो जागा राहतो असा मनुष्य हा भूतालावावर एकमात्र प्राणी आहे.

0 comments: